बोमन इराणी यांचा मुलगा कायोज याचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Share

“अभिनयासाठी आता मी तयार नाही. मला कॅमेऱ्याच्या मागे काम करणे अधिक सोयीचे आणि समाधानकारक वाटते. मला हेही कळाले की अभिनय माझ्यासाठी नाही.”, असे कायोजने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते.

कायोजने पुढे सांगितले की, “लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या, पण मी अभिनय क्षेत्रात फार काही करू शकलो नाही, याची जाणीव आहे. मात्र, मी आता चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित करणार आहे.”

कायोजने कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. आता तो ‘सरजमीं’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात काजोल, इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

कायोजच्या या निर्णयाने इंडस्ट्रीत आश्चर्य व्यक्त केले जात असले, तरी अनेकांनी त्याच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.